वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
प्रतिनिधी : आनंदा भालेराव
शहापूर तालुक्याच्या वतीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सेक्युलर) चा पक्षप्रवेश व मार्गदर्शन मेळावा आज रविवार, दि. 19 जानेवारी 2026 रोजी गंगा देवस्थान आगरी समाज हॉल, वाफे–गोठेघर येथे उत्साहात पार पडला.
मेळाव्याची सुरुवात महामानवांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. आयु. कुमार थोरात यांनी सूत्रसंचालन करत उपस्थित मान्यवरांचे फुलरूपी व शब्दसुमनांनी स्वागत केले.
यावेळी महाराष्ट्र राज्य सचिव आयु. किरणजी चन्ने यांनी मार्गदर्शन करताना शोषित, पीडित, कष्टकरी, शेतमजूर तसेच समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आरपीआय सेक्युलर कटिबद्ध असल्याचे ठामपणे सांगितले.
![]() |
| राष्ट्रीय अध्यक्ष व संस्थापक आयु. श्यामदादा गायकवाड |
राष्ट्रीय अध्यक्ष व संस्थापक आयु. श्यामदादा गायकवाड यांनी आपल्या भाषणात युवकांना आवाहन करत सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणारा आरपीआय सेक्युलर पक्ष समाजातील सर्व जाती-धर्मांना समान न्याय देण्यासाठी काम करत आहे. संविधान संपविण्याचा कट काही शक्तींकडून रचला जात असल्याने सर्वांनी एकत्र येणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या मेळाव्यात कल्याण, नाशिक, अंबरनाथ, भिवंडी व शहापूर येथून आलेल्या अनेक युवकांनी पक्षप्रवेश केला. पक्षात प्रवेश करणाऱ्यांमध्ये डॉक्टर, वकील, अभियंते, पदवीधर युवक तसेच ग्रामपंचायत सदस्यांचा समावेश होता.
या कार्यक्रमास ठाणे जिल्हाध्यक्ष आयु. रविंद्र चंदने, ज्येष्ठ नेते आयु. अभिमन्यु भालेराव, आयु. रमेशजी जाधव (कार्यकारी अध्यक्ष), आयु. गुरुनाथ गायकवाड (प्रदेश संघटक), आयु. अनिलभाई कांबळे (अध्यक्ष, शहापूर तालुका), आयु. प्रविण केदारे, फिरोजभाई शेख यांच्यासह संपूर्ण कार्यकारिणी उपस्थित होती. सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन हा मेळावा यशस्वी केला.
आरपीआय सेक्युलर ठाणे जिल्ह्याच्या वतीने शहापूर तालुका कार्यकारिणीचे आभार मानण्यात आले.
“श्यामदादा गायकवाड आगे बढो, हम तुम्हारे साथ है”,
“आरपीआय सेक्युलर जिंदाबाद”
अशा घोषणांनी वातावरण दणाणून गेले. राष्ट्रगीताने मेळाव्याची सांगता करण्यात आली.




Post a Comment
0 Comments