प्रतिनिधी : मोहन दिपके
येत्या 26 जानेवारी रोजी संत नामदेव कवायत मैदान हिंगोली येथे साजरा होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व कार्यक्रम नियोजनबद्ध व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडावेत, यासाठी आज निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोदवड यांच्या अध्यक्षतेखाली पूर्वतयारी आढावा बैठक पार पडली.
या बैठकीला नायब तहसीलदार चंद्रकांत गोळेगावकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी भाकरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक ए. जे. अखिल, डॉ. सचिन बोधगिरे, शाखा अभियंता डी. आर. धाडवे, गटशिक्षणाधिकारी एन. व्ही. मोरे, नगर परिषदेचे आर. व्ही. बांगर, पी. एस. अवचार, एस. जे. घुगे उपस्थित होते.
मुख्य ध्वजारोहण समारंभ, परेड, सांस्कृतिक कार्यक्रम, शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग, सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियोजन, स्वच्छता, विद्युत व ध्वनी व्यवस्था, आरोग्य सेवा तसेच आपत्कालीन परिस्थितीतील उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. महिला व बालविकास विभागामार्फत बालविवाह प्रतिबंधक तसेच अनाथ बालकांचे संगोपन विषयांवर चित्ररथाचे आयोजन संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर जनजागृती करण्यात यावी. विविध विभागांना आपापल्या जबाबदाऱ्या निश्चित करून देण्यात आल्या असून सर्व तयारी वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
प्रजासत्ताक दिनानिमित्त कार्यक्रम नागरिकांच्या सहभागाने उत्साहात व शांततेत पार पडावा, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. बैठकीस जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, पोलीस विभाग, नगरपालिका, शिक्षण, सार्वजनिक बांधकाम तसेच अन्य संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.



Post a Comment
0 Comments