Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

*क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिन जिल्हा परिषद शाळा कांदळी येथे उत्साहात संपन्न*

वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज 

ठाणे जिल्हा संपादक - शंकर गायकवाड

आज रोजी 3 जानेवारी 2026 रोजी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिन कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद शाळा कांदळी, भिवंडी ठाणे येथे करण्यात आले.

 

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा प्रगती दळवी व सदस्या कविता चंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले.


सर्व विद्यार्थ्यांनी पुष्प अर्पण करून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले.


*क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर मुख्याध्यापिका जयश्री अरुण स्पष्टे यांनी प्रबोधनपर मार्गदर्शन केले*

 


उपस्थित विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर भाषणे सादर केली.

विद्यार्थ्यांनी अनेक खेळ खेळत बालिका दिनांचा आनंद लुटला 

उपस्थित सर्व महिलांनी सावित्रीबाई फुले यांचा जय घोष केला.


*संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शिक्षक अशोक गायकवाड यांनी केले*. 

सदर जयंती कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा प्रगती दळवी, सदस्या कविता चंदे, आरती पाटील, आशा वर्कर मानसी जाधव, अंगणवाडी मदतनीस गोदावरी जाधव, विजया जाधव, शिक्षिका जयश्री स्पष्टे, शिक्षक अशोक गायकवाड व विद्यार्थी उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments