वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
प्रतिनिधी : शंकर गायकवाड
मुरबाड तालुक्यात भारतीय बौद्ध महासभा शाखा मुरबाड तालुका पुरुष पदाधिकारी व कार्यकारिणीच्या वतीने धम्मप्रवचन तसेच धम्माचा प्रचार व प्रसाराचे कार्य सातत्याने सुरू आहे. ‘दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया’ या संस्थेच्या माध्यमातून धम्मयान दिनदर्शिका (कॅलेंडर) घरोघरी पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य संस्थेचे पदाधिकारी करीत आहेत.
मुरबाड तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन धम्मयान कॅलेंडरचे वितरण करण्यात येत असून, हे कार्य पदाधिकारी स्वतःच्या खर्चाने, वेळ देऊन आणि सेवाभावाने करत आहेत. या माध्यमातून समाजात धम्मविचारांचा प्रसार होत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
अलीकडेच मुरबाड तालुक्यातील मौजे आळवे गाव येथे घरोघरी धम्मयान कॅलेंडर देताना, या कॅलेंडरमध्ये भगवान गौतम बुद्ध तसेच विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सविस्तर माहिती असल्याचे नागरिकांना सांगण्यात आले व ती माहिती वाचण्याचे आवाहन करण्यात आले.
या दरम्यान एका बौद्ध वाड्यात एक मावशी धम्मयान कॅलेंडरमधील माहिती वाचताना दिसून आल्या, त्याचा मोबाईलद्वारे फोटो घेण्यात आला. त्यानंतर पुढे कॅलेंडर वाटप करून परत येताना एक बाबा देखील कॅलेंडरमधील माहिती वाचताना दिसून आले, त्यांचाही फोटो मोबाईलमध्ये टिपण्यात आला. हे दृश्य धम्मविचार लोकांपर्यंत पोहोचत असल्याचे सकारात्मक उदाहरण असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
या उपक्रमाबाबत भारतीय बौद्ध महासभा शाखा मुरबाड तालुक्याचे कार्यालयीन सचिव आयु. दिलीप तातु धनगर (मु. नढई, ता. मुरबाड, जि. ठाणे) तसेच संस्कार सचिव आयु. विजय झिपा खोंलबे (मु. असोळे, ता. मुरबाड, जि. ठाणे) यांनी माहिती दिली.



Post a Comment
0 Comments