वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
प्रतिनिधी : शंकर गायकवाड
उमरी मांडाखळी परिसरातील सुवर्ण बुद्ध विहाराच्या दहा एकर प्रशस्त जागेत जागतिक धम्म ध्वज दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेली पहिली आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषद अत्यंत भक्तिमय व धम्ममय वातावरणात यशस्वीरित्या पार पडली.
या परिषदेसाठी थायलंड, व्हिएतनाम आणि श्रीलंका या बौद्ध राष्ट्रांतील विद्वान बौद्ध भिक्खू संघाची विशेष उपस्थिती लाभली होती. “बुद्धं शरणं गच्छामि” या जयघोषात पंचशील धम्म ध्वजाचे विधिवत ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थित बौद्ध उपासकांनी पुष्पवृष्टी करत भिक्खू संघाचे भव्य स्वागत केले. आयोजकांच्या वतीने भिक्खू संघाला चिवरदान करून त्यांचे आशीर्वाद घेण्यात आले.
या ऐतिहासिक परिषदेला विविध देशांतील श्रद्धावान धम्म उपासक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सिने अभिनेते व धम्म उपासक डॉ. गगन मलिक, माजी मंत्री व काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र पाल गौतम, आमदार राहुलजी पाटील, आमदार राजेशदादा विटेकर, माजी आमदार व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्रानी, पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्यासह अनेक मान्यवरांनी या परिषदेला उपस्थिती दर्शविली.
हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या बौद्ध बांधवांमुळे परिषदेचे स्वरूप अत्यंत भव्य झाले होते. भिक्खू संघाने दिलेली धम्मदेशना ही उपस्थितांसाठी प्रेरणादायी व ऊर्जा देणारी ठरली. ही परिषद बौद्ध धम्माच्या शांतता, करुणा व बंधुतेच्या संदेशाला अधिक व्यापक स्तरावर पोहोचवणारी ठरली, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.



Post a Comment
0 Comments