Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

रेल्वे पेंशनर्सच्या हक्कांसाठी मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक; ८वा वेतन आयोग व आरोग्य सुविधांवर ठाम भूमिका.

वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज

प्रतिनिधी : आनंदा भालेराव

मुंबई : ऑल इंडिया रेल्वे पेंशनर वेल्फेयर फेडरेशन मुख्यालय, मुंबई मंडळ यांच्या वतीने आज दिनांक १९ जानेवारी रोजी सकाळी ११.०० वाजता एन.आर.एम.यू. मुख्यालय कार्यालय, माटुंगा येथे महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. ही बैठक काॅ. वेणु पी. नायर, महामंत्री (मध्य रेल्वे/कोकण रेल्वे) यांच्या खंबीर नेतृत्वाखाली पार पडली. यावेळी काॅ. व्ही. आनंदन, महामंत्री, हे विशेष उपस्थित होते.

उपस्थित सदस्यांना मार्गदर्शन करताना महामंत्री काॅ. वेणु पी. नायर यांनी सेवानिवृत्त रेल्वे कामगारांच्या प्रश्नांबाबत युनियनची भूमिका स्पष्ट केली. सर्व रेल्वे कामगारांना ८वा वेतन आयोग तातडीने लागू झाला पाहिजे, तसेच ज्येष्ठ सेवानिवृत्त कामगारांना दर्जेदार रुग्णालयीन सुविधा उपलब्ध झाल्याच पाहिजेत, यावर त्यांनी ठाम भूमिका मांडली. यासह पेंशनर्सच्या विविध कल्याणकारी सुविधा, हक्क व मागण्यांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

या बैठकीस काॅ. रसिक मलबारी (कार्यकारी अध्यक्ष), काॅ. जे. एन. पाटील (मुंबई मंडळ अध्यक्ष), काॅ. पी. एस. शिंदे (झोनल सचिव, ए.आय.आर.एफ.), काॅ. आनंदा भालेराव (सचिव, मुंबई मंडळ), काॅ. अहमद खान (सचिव, इगतपुरी शाखा), काॅ. दिलीप शिंदे (ऑर्गनायझिंग सेक्रेटरी, कसारा शाखा) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


बैठकीच्या शेवटी उपस्थितांनी “काॅ. वेणु पी. नायर महामंत्री – जी.के. लाल – एन.आर.एम.यू. जिंदाबाद” तसेच

“ऑल इंडिया रेल्वे पेंशनर वेल्फेयर फेडरेशन जिंदाबाद” अशा जोरदार घोषणा देत एकजूट व्यक्त केली.




Post a Comment

0 Comments