Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

महाड : चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी निमित्त राज्यव्यापी कार्यक्रमांचे नियोजन

 


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज

प्रतिनिधी : मोहन दीपके

महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहास शंभर वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यभर तसेच रायगड जिल्हा आणि महाड तालुक्यातील प्रत्येक गावात विविध कार्यक्रम व उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण संयुक्त बैठक संपन्न झाली. ही बैठक डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांचे महासंचालक श्री. सुनील वारे यांच्या उपस्थितीत नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस या संघटनेच्या वतीने घेण्यात आली.


या बैठकीस निबंधक विशाल लोंढे, राज्य सचिव वैभव गिते, संजय सोनवणे, आप्पा गायकवाड, गोविंद मोरे, भाऊराव तायडे, जय माने, आनंद जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

२० मार्च १९२७ रोजी संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळे सत्याग्रह करून सामाजिक समतेचा ऐतिहासिक लढा उभारला होता. या ऐतिहासिक आंदोलनाला १०० वर्षे पूर्ण होत असल्याने राज्यातील प्रत्येक जिल्हा व तालुकास्तरावर बाबासाहेबांच्या विचारांवर आधारित वैचारिक, सांस्कृतिक कार्यक्रम राबविणे, तसेच संवैधानिक मूल्यांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी व्यापक नियोजन करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.


या शताब्दी वर्षानिमित्त होणारे उपक्रम समाजात समता, बंधुता आणि न्यायाच्या मूल्यांना अधिक बळ देणारे ठरतील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.



Post a Comment

0 Comments