Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

बुद्धभूमी फाउंडेशन, कल्याण येथे महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज 

कल्याण | दि. १८ जानेवारी २०२५ (रविवार)

कल्याण येथील बुद्धभूमी फाउंडेशनच्या वतीने रविवारी सायंकाळी ५.०० वाजता एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस कल्याण, ठाणे, उल्हासनगर व नेरळ येथील सामाजिक कार्यकर्ते, प्रतिनिधी तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत बुद्धभूमी फाउंडेशनच्या जमिनीवरून प्रस्तावित उड्डाणपुलाच्या संदर्भात शासन-प्रशासन व लोकप्रतिनिधींनी घेतलेल्या अन्यायकारक भूमिकेवर तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. यासोबतच १५० फूट ग्लोबल रिक्लायनिंग बुद्धमूर्ती प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

तसेच बोधी इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा करण्याबाबत आणि कल्याण लोकसभा सामाजिक संघ स्थापन करण्याच्या प्रस्तावावरही सखोल विचारमंथन झाले.

सर्व उपस्थित प्रतिनिधींनी आपापले मौलिक विचार मांडून बैठकीस यशस्वी केले. बुद्धभूमी फाउंडेशनतर्फे सर्व उपस्थितांचे सहकार्य व सहभागाबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.



Post a Comment

0 Comments