Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

औरंगाबाद | नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार सोहळा

 


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज

कार्यकारी संपादक : रितेश साबळे

औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने उल्लेखनीय यश संपादन करत संपूर्ण पॅनलसह चार नगरसेवक निवडून आणले आहेत. या विजयाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद येथील पक्ष कार्यालयात नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला.


या निवडणुकीत अमित सुधाकर भुईगळ, जरीना जावेद कुरैशी, करुणा मेघानंद जाधव आणि अफसर खान (यासीन खान) हे उमेदवार नगरसेवक म्हणून निर्वाचित झाले आहेत. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत पक्षाच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला.


वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अरुंधतीताई शिरसाठ यांच्या हस्ते नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी नगरसेवकांना शुभेच्छा देत शहरातील वंचित, शोषित आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन काम करण्याचे आवाहन केले. लोकशाही प्रक्रियेतून मिळालेल्या या संधीचा उपयोग जनतेच्या हितासाठी प्रामाणिकपणे करावा, असे त्यांनी सांगितले.


या सत्कार समारंभास वंचित बहुजन आघाडीचे औरंगाबाद शहर व जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडणुकीतील यशामुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून आगामी काळात शहराच्या विकासासाठी ठोस भूमिका घेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.



Post a Comment

0 Comments