![]() |
| हुपरीत ऐतिहासिक सन्मानाचा क्षण! |
प्रतिनिधी - तेजस घोसाळे
आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराजांच्या पवित्र भूमीत आणि चांदीसाठी जगप्रसिद्ध असलेल्या हुपरी (जि. कोल्हापूर) येथे रविवार, दि. १८ जानेवारी २०२६ रोजी सामाजिक, धम्म व उद्योजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव करत आयु. डॉ. रविंद्र विठ्ठल घोसाळे (संगमनेर, जि. अहिल्यानगर) यांना “भंते नागरत्नजी राज्यस्तरीय पुरस्कार” प्रदान करण्यात आला.
१० वी (दशकपूर्ती) युवा बौद्ध धम्म परिषद या भव्य कार्यक्रमात भीमकन्या व प्रसिद्ध मराठी अभिनेत्री चिन्मयी सुमित यांच्या शुभहस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी पूज्य भंते सिरी सारो, हुपरी नगराध्यक्ष मा. मंगलराव माळगे, पैसा फंड बँक (स्थापना २६ जानेवारी १९५०) चे एम.डी. मा. शिवराज नाईक यांच्यासह महाराष्ट्र व कर्नाटकातील हजारो बौद्ध उपासक-उपासिका उपस्थित होते.
राज्यभर सामाजिक व उद्योजकीय क्षेत्रात ठसा उमटविणाऱ्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आल्याने डॉ. घोसाळे यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव झाला. या ऐतिहासिक धम्म परिषदेला महाराष्ट्र व कर्नाटकातील अनेक जिल्ह्यांतील मान्यवरांनी उपस्थित राहून साक्षीदार होण्याचा मान मिळवला.
पुरस्कार स्वीकारताना डॉ. रविंद्र घोसाळे यांनी हा सन्मान युवा बौद्ध धम्म परिषद व संस्थेचे संस्थापक चेअरमन आयु. डॉ. किरण भोसले, आयु. सतीश भारतवासी, आयु. डॉ. संतोष भासले तसेच संपूर्ण संयोजक समितीला अर्पण केला. गेल्या ३० वर्षांपासून धम्म चळवळ व उद्योजकीय क्षेत्रात सोबत असलेल्या, विशेषतः संगमनेर व अकोले येथील आंबेडकरी चळवळीतील सर्व सहकाऱ्यांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले.
कार्यक्रमात पूज्य भंते सिरी सारो यांनी “बौद्ध धम्म क्रांतीची पाच सूत्रे” या विषयावर प्रभावी मार्गदर्शन केले, तर अभिनेत्री चिन्मयी सुमित यांनी परिवर्तनवादी परंपरेचे वारसदार म्हणून असलेल्या जबाबदारीवर सखोल व प्रेरणादायी विचार मांडत उपस्थितांची मने जिंकून घेतली.
धम्म, सामाजिक परिवर्तन आणि प्रेरणादायी नेतृत्वाचा संगम ठरलेला हा सोहळा हुपरीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदला गेला.



Post a Comment
0 Comments