Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

मुरबाडमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त महिलांसाठी क्रीडा व सामाजिक उपक्रमांचे आयोजन



वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज 

ठाणे जिल्हा संपादक - शंकर गायकवाड

मुरबाड :- नवचैतन्य लोकसंचलित साधन, मुरबाड यांच्या वतीने भारतातील पहिल्या शिक्षिका माता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त दि. 3 जानेवारी रोजी मुरबाड तालुक्यात विविध महिलाभिमुख क्रीडा व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कुसुमआई गार्डन येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.


या उपक्रमांत कबड्डी, संगीत खुर्ची आदी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. खेळांच्या माध्यमातून महिलांमध्ये आत्मविश्वास, एकोपा व संघभावनेचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाला साजई गावच्या सरपंच नम्रताई सासे, पोलीस पाटील भारतीताई देसले, अंगणवाडी सेविका उषाताई देसले, CMRS अध्यक्षा सुरेखाताई खोलाबे, SMRS सदस्य शुभांगीताई माळवे तसेच SMRS कार्यकारणी मंडळातील सुषमा भवार, संगीता गायकवाड, संगीता जाधव, अनिता धनगर, समिधा उबाळे, संयोगीता रेणुखा माळवे, विद्या खाटेघर आदी मान्यवर उपस्थित होत्या.

यावेळी ज्योतीताई अहिरे, संगीता गायकवाड व सुषमा भवार यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी CMRS/SMRS अध्यक्षा सुरेखाताई खोलाबे होत्या. त्यांनी अध्यक्षीय भाषणात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत महिलांच्या सक्षमीकरणासाठी क्रीडा व सामाजिक उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.


सुरेखाताई खोलाबे यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. महिलांच्या सक्षमीकरणासाठी क्रीडा व सामाजिक उपक्रम आवश्यक असून सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना कृतीत उतरवणारा हा उपक्रम मुरबाडमध्ये कौतुकाचा विषय ठरत आहे.



Post a Comment

0 Comments