Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

समजीवनी संघटनेतर्फे अघई कातकरी वाडीमध्ये स्वच्छता अभियान; राजमाता जिजामाता व स्वामी विवेकानंद जयंती साजरी.

 प्रतिनिधी- शंकर गायकवाड

आघई | समजीवनी संघटनेच्या वतीने अघई येथील कातकरी वाडी परिसरात राजमाता जिजामाता आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त विशेष स्वच्छता अभियान राबवून त्यांची जयंती अर्थपूर्ण पद्धतीने साजरी करण्यात आली. अघई धरणालगतच्या अभयारण्य परिसरात हे स्वच्छता अभियान पार पडले.

जंगलाचे महत्त्व, निसर्ग संवर्धन तसेच जमिनीचे संरक्षण याबाबत जनजागृती व्हावी आणि नागरिकांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने हे अभियान आयोजित करण्यात आले होते. यावेळी परिसरातील कचरा साफ करून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला.

राजमाता जिजामाता यांनी दिलेले संस्कार आणि स्वामी विवेकानंद यांचे विचार आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असून समाजाने निसर्ग आणि पर्यावरणाचे संरक्षण करणे ही काळाची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

१२ जानेवारी रोजी राजमाता जिजामाता व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त समजीवनी संघटनेने राबवलेल्या या उपक्रमाचे स्थानिक नागरिकांकडून कौतुक करण्यात आले. या अभियानामुळे परिसर स्वच्छ तर झालाच, सोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेशही प्रभावीपणे पोहोचला.



Tags

Post a Comment

0 Comments