वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
कार्यकारी संपादक रितेश साबळे
२६ जानेवारी हा भारताचा प्रजासत्ताक दिन असून, या दिवशी भारतीय संविधान अंमलात आले. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क, समानता, स्वातंत्र्य, न्याय, मान-सन्मान आणि राष्ट्राची एकता अबाधित ठेवण्याची हमी देणारे हे संविधान मानवमुक्तीचे कैवारी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक परिश्रमातून अस्तित्वात आले.
मात्र भाजप आपली संविधानविरोधी व नीच मानसिकता सोडायला तयार नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी प्रजासत्ताक दिनासारख्या पवित्र दिवशी जाणीवपूर्वक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख टाळून संविधाननिर्मात्यांचा अवमान केला आहे. हा प्रकार अत्यंत निंदनीय व लोकशाही मूल्यांना काळीमा फासणारा आहे.
यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य केले होते. तसेच संविधान बदलण्याच्या आशयाची विधाने भाजपकडून सातत्याने केली जात असून, यामुळे संविधानप्रेमी नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानणाऱ्या महिला अधिकाऱ्यांसह विविध स्तरातून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात येत आहे. बाबासाहेबांचा अवमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, असा ठाम इशारा देत गिरीश महाजन यांच्या या कृत्याचा जाहीर निषेध करण्यात आला आहे.


Post a Comment
0 Comments