वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
प्रतिनिधी : मोहन दिपके
कळमनुरी तालुक्यात सध्या पोलीस पाटील भरती प्रक्रिया सुरू असून तालुक्यात एकूण ८९ रिक्त पदांसाठी ही भरती होत आहे. या भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत व्हावी, या उद्देशाने वंचित बहुजन आघाडी कळमनुरी तालुक्याच्या वतीने मोफत पुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे.
या उपक्रमाअंतर्गत पोलीस पाटील भरती परीक्षेसाठी उपयुक्त असलेली विद्याभारती पोलीस पाटील मार्गदर्शक, आपला हिंगोली जिल्हा, चालू घडामोडी तसेच सामान्य ज्ञान यांसारखी महत्त्वाची पुस्तके विद्यार्थ्यांना मोफत दिली जाणार आहेत.
तालुक्यातील पोलीस पाटील भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व इच्छुक विद्यार्थ्यांनी वंचित बहुजन आघाडी संपर्क कार्यालय, कळमनुरी येथे संपर्क साधून या मोफत पुस्तकांचा लाभ घ्यावा व परीक्षेच्या तयारीसाठी उत्साहाने आणि जोमाने अभ्यास करावा, असे आवाहन कळमनुरी तालुका अध्यक्ष राजू कांबळे यांनी केले आहे.


Post a Comment
0 Comments