वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
प्रतिनिधी : शंकर गायकवाड
अंबरनाथ | दि. १९ जानेवारी २०२५ रोजी अंबरनाथ शहरात वंचित बहुजन आघाडीच्या नव्या संघर्षाची आणि नव्या परिवर्तनाची पहिली अधिकृत बैठक उत्साहात पार पडली. ही बैठक एडवोकेट अनिल काळे, पदमाताई इंगळे तसेच सर्व सहकारी कार्यकर्त्यांच्या समन्वय व सहकार्याने अंबरनाथ पूर्व येथे यशस्वीरीत्या संपन्न झाली.
ही पहिली बैठक केवळ औपचारिक चर्चा नव्हती, तर संघटन अधिक मजबूत करण्यासाठी, कार्यकर्त्यांना योग्य दिशा देण्यासाठी आणि बहुजनांच्या हक्कांसाठी नव्या जोमाने काम करण्याचा ठाम निर्धार करण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. अन्याय, शोषण आणि भेदभावाविरुद्ध एकजुटीने उभे राहण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.
बैठकीदरम्यान शोषित, वंचित, कष्टकरी वर्ग तसेच तरुणांच्या हक्कांसाठी लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला. अंबरनाथ शहरात वंचितांचा आवाज अधिक बुलंद करण्यासाठी संघटनात्मक पातळीवर प्रभावी काम करण्यावर भर देण्यात आला.
या बैठकीला अनेक सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर, इच्छुक नागरिक, युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडीशी जोडले जाण्याची इच्छा अनेकांनी व्यक्त केली असून, पक्षाच्या विचारधारेला शहरात अधिक व्यापक स्वरूप देण्याचा निर्धार करण्यात आला.
यावेळी अंबरनाथमधील सर्व युवक-युवती, सामाजिक कार्यकर्ते आणि परिवर्तनावर विश्वास ठेवणाऱ्या बांधव-भगिनींना आवाहन करण्यात आले की, एकजुटीने प्रयत्न करून शासनकर्ती जमात बनण्याच्या दिशेने वाटचाल करूया. मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडीत सहभागी होऊन आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचे हात अधिक बळकट करूया, असे आवाहन उपस्थित नेत्यांनी केले.


Post a Comment
0 Comments