वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
प्रतिनिधी : आनंदा भालेराव
वासिंद (ता. शहापूर, जि. ठाणे) : सरस्वती विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, वासिंद येथे आज बुधवार, दिनांक २१ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. या समारंभात शाळेच्या शैक्षणिक कार्याला एकहाती मदत म्हणून ऑल इंडिया रेल्वे पेंशनर वेल्फेयर फेडरेशन व एन. आर. एम. यु. च्या वतीने एक लाख रुपयांचा धनादेश शाळेस प्रदान करण्यात आला.
हा धनादेश काॅ. वेणु पी. नायर, महामंत्री (मध्य रेल्वे/कोकण रेल्वे) यांच्या मार्गदर्शनाखाली काॅ. रसिक मलबारी (कार्यकारी अध्यक्ष, मुख्यालय), काॅ. संदीप जाधव (खजिनदार, मुख्यालय), काॅ. अरुण मनोरे (कार्यकारी अध्यक्ष, मुंबई मंडळ), काॅ. जे. एन. पाटील (अध्यक्ष, मुंबई मंडळ) व काॅ. नारायण सोनावने (उपाध्यक्ष, मुंबई मंडळ) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी काॅ. वसंत कासार (ऑर्गनायझिंग सेक्रेटरी, मुंबई मंडळ), काॅ. आनंदा भालेराव (सचिव, मुंबई मंडळ) तसेच वासिंद शाखेच्या वतीने काॅ. अनंत लगड (सचिव), काॅ. नंदू बोंडवे (अध्यक्ष) व काॅ. अशोक महाजन (खजिनदार) उपस्थित होते.
शाळेतील शिक्षकवर्गाने कोणताही खासदार अथवा आमदार नसूनही एका लढवय्या कामगार युनियनच्या महामंत्र्यांनी शाळेसाठी दिलेल्या या मोलाच्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार मानले. सर्वधर्मसमभाव आणि संविधानिक मूल्ये जपणारी ही युनियन समाजोपयोगी कार्यात सदैव अग्रणी असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
मजदूर मसिहा काॅ. वेणु पी. नायर यांना उपस्थितांनी लाल सलाम दिला. “एन. आर. एम. यु. जिंदाबाद” व “ऑल इंडिया रेल्वे पेंशनर वेल्फेयर फेडरेशन जिंदाबाद” अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.



Post a Comment
0 Comments