वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
प्रतिनिधी : आनंदा भालेराव
पुणे | दि. ९ जानेवारी २०२६
कोरेगाव भीमा चौकशी आयोगाच्या कामकाजाअंतर्गत आज दिनांक ९ जानेवारी २०२६ रोजी आयोगाने कोरेगाव भीमा परिसरातील महत्त्वाच्या स्थळांची स्पॉट इन्स्पेक्शन (स्थळ पाहणी) केली. या पाहणीसाठी आयोगाचे अध्यक्ष डॉ. जयनारायण पटेल (कलकत्ता उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश) तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्य सचिव सुमित मलिक उपस्थित होते.
या वेळी छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळ, गोविंद गोपाळ महार यांची समाधी, भैरवनाथ मंदिर तसेच कोरेगाव भीमा विजयस्तंभ या ऐतिहासिक व महत्त्वपूर्ण स्थळांना आयोगाने भेट दिली. या स्पॉट इन्स्पेक्शन दरम्यान आयोगासोबत आंबेडकरी समाजाचे सुप्रसिद्ध वकील अॅड. किरण चन्ने, अॅड. बी. जी. बनसोडे व अॅड. राहुल मखरे उपस्थित होते. हे वकील कोरेगाव भीमा प्रकरणात पीडितांची बाजू सातत्याने आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडत आहेत.
तसेच कोरेगाव भीमा चौकशी आयोगाचे मुख्य साक्षीदार रविंद्रजी चंदने हे देखील या पाहणीस उपस्थित होते. उल्लेखनीय बाब म्हणजे, २०१८ सालापासून कोरेगाव भीमा चौकशी आयोगाचे कामकाज अखंडपणे सुरू असून आंबेडकरी समाजाच्या वतीने वरील वकिलांकडून आयोगासमोर प्रभावीपणे भूमिका मांडली जात आहे.



Post a Comment
0 Comments