Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

*वंचित बहुजन आघाडीच्या* अख्तर खातून अलीमुद्दीन यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात ।बार्शीटाकळी नगरपरिषदेला पहिली महिला मुस्लिम नगराध्यक्ष

 


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज

प्रतिनिधी : रितेश साबळ

 बार्शीटाकळी, अकोला

अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी नगरपरिषदेत नगराध्यक्षपदी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार अख्तर खातून अलीमुद्दीन यांची विजयी निवड झाली असून, आज त्यांनी अधिकृतपणे नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. या ऐतिहासिक पदग्रहण सोहळ्यामुळे बार्शीटाकळी शहरात राजकीय व सामाजिक वर्तुळात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या पदग्रहण सोहळ्यास *वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर प्रमुख उपस्थित होते.* यावेळी बोलताना त्यांनी अख्तर खातून अलीमुद्दीन यांचे अभिनंदन करत नगरपरिषदेमार्फत सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी पारदर्शक व लोकाभिमुख कारभार होईल, असा विश्वास व्यक्त केला.

नवनिर्वाचित नगराध्यक्ष अख्तर खातून अलीमुद्दीन यांनी आपल्या मनोगतात शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचे आश्वासन दिले. स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण तसेच अल्पसंख्याक व दुर्बल घटकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्यावर भर देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमास वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, अकोला जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, युवा जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी नवनिर्वाचित नगराध्यक्षांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.



Post a Comment

0 Comments