वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
प्रतिनिधी : शंकर गायकवाड
आज दि. ५ जानेवारी रोजी तमाम शिवसैनिकांच्या माँ साहेब अर्थात स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ममता दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शहापूर तालुका युवासेनेच्या वतीने माँ साहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना भावपूर्ण मानवंदना देण्यात आली.
या प्रसंगी युवासेना तालुका युवाधिकारी अतुल भालके, शिवसेना शहापूर शहरप्रमुख विजयजी देशमुख, जिल्हा सहसचिव डॉ. अजित पोतदार, युवासेना शहर युवाधिकारी हर्षद राऊत, ज्येष्ठ शिवसैनिक दादा पवार, अल्पसंख्यांक शहर युवाधिकारी मोईन शेख, उपतालुका युवाधिकारी गणेश विशे, किरण पाठारी तसेच युवासेना वॉर्ड युवाधिकारी संकेत वारघडे यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.
माँ साहेबांच्या ममतामय व्यक्तिमत्त्वाची आठवण करून देत उपस्थितांनी त्यांच्या सामाजिक व कौटुंबिक मूल्यांना अभिवादन केले.


Post a Comment
0 Comments