वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
प्रतिनिधी : शंकर गायकवाड
बहुजन समाज पार्टीच्या नागपूर महानगरपालिकेतील एकमेव नगरसेविका हर्षला संजय जयस्वाल यांनी नागपूर महानगरपालिकेत २००२ पासून अस्तित्वात असलेल्या बसपाच्या कक्षाला (रूम नं. २१) मंगळवार, २१ जानेवारी रोजी भेट दिली.
यावेळी बहुजन समाज पार्टीचे प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांनी हर्षला जयस्वाल यांचे शाल देऊन स्वागत केले.
या प्रसंगी नागपूर जिल्हाध्यक्ष योगेश लांजेवार, माजी नगरसेविका वीरंका भिवगडे, माजी नगरसेवक संजय जयस्वाल, मोहम्मद जमाल, माजी जिल्हा प्रभारी विलास सोमकुवर तसेच बसपा कार्यकर्ते रिंकू कपूर, बबलू आदी मान्यवर उपस्थित होते.
हर्षला जयस्वाल या यापूर्वी बसपाच्या वतीने दोन वेळा निवडून आल्या असून, त्या आशीनगर झोनच्या सभापतीपदावरही विराजमान झाल्या होत्या. त्यांचे पती संजय जयस्वाल हे २००२ साली प्रथमच बसपाच्या तिकिटावर निवडून आले होते. तेव्हापासून जयस्वाल कुटुंबाचा बहुजन समाज पार्टीसोबत सक्रिय सहभाग राहिला आहे.


Post a Comment
0 Comments