Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

कळमनुरी शहरात नगराध्यक्षा शिंदे गटाच्या कार्यालयासमोर अंधारच,96 कोटी चा उधळा, कॅन्डल लाऊन वंचित बहुजन आघाडीने केला निषेध, रमजान महिन्यामध्ये मज्जिदि समोरीलच लाईट बंद..!

 


प्रतिनिधी - मोहन दिपके 

कळमनुरी शहरामध्ये असणारे कोट्यावधी रुपये खर्च करून विद्युत खांबावरील लाईट जवळपास 22 विद्युत खांबावरील लाईट गेली जवळपास एका महिन्यापासून बंद आहे.शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वतीने गेली काही महिने अगोदरच कळमनुरी विधानसभा आमदार संतोष बांगर यांच्या निधीतून हे काम केल्याचे शहरात मोठ्या प्रमाणात वाजागाजा केला होता परंतु गेली एक महिन्यापासून सदरील जवळपास 22 खांबावर लाईट बंद अवस्थेत आहे. मुख्य म्हणजे रमजानचा महिना सुरू असून शिवसेना शिंदे गटाचे असलेले कार्यालय याच्यासमोरील सहा खांब्यावरील लाईट बंद असून शिंदे गटाच्या कार्यालयासमोर मज्जित देखील आहे परंतु याकडे सुद्धा नगराध्यक्ष व शिंदे गटाच्या नगरसेवकांचे कदापिही लक्ष नाही, शहरांमधील लाईट व्यवस्थित रहावी यासाठी मुस्लिम बांधवांतर्फे नगरपरिषद यांना निवेदन देखील काही दिवसा अगोदर देण्यात आले होते परंतु याकडे सुद्धा नगरपरिषदेने पूर्णता दुर्लक्ष केलेले आहे. यामुळे ही खोट्यावधीची उधळपट्टी आहे का ? 

याचा निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडी कळमनुरीच्या वतीने या सर्व बंद असलेल्या लाईट खांबाखाली कॅण्डल लावून निषेध व्यक्त केला व दोन दिवसात रमजान माझ्या पवित्र महिना सुरू असून जर ही शहरातील खांबावरील लाईट सुरू झाले नाहीत तर या सर्व निधीची चौकशी लावण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दिला. 

यावेळी कळमनुरी वंचित बहुजन आघाडीचे मां. तालुका अध्यक्ष राजू कांबळे, युवा ता. अ. मोहम्मद असलम, मा. श.अ. शकील पठाण, मुस्लिम सेवा संघाचे जि.अ.शेख आमेर ,युवा काँग्रेस जि.उपाध्यक्ष फैसल खान, वंचितचे जितेश कदम, दिनेश पाईकराव,दिनेश वाढवे,अमोल पुंडगे, समाधान पाईकराव व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments