![]() |
| सेवानिवृत्त कामगारांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा. |
प्रतिनिधी -आनंदा भालेराव
मुंबई | दि. 21 फेब्रुवारी 2026
ऑल इंडिया रेल्वे पेंशनर वेल्फेयर फेडरेशन मुंबई मंडळाच्या वतीने आज दुपारी ३ वाजता सेवानिवृत्त कामगारांच्या विविध अडचणी व प्रलंबित प्रश्नांबाबत महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. ही बैठक कॉ. वेणु पी. नायर (महामंत्री, मध्य रेल्वे व कोकण रेल्वे) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. बैठकीचे अध्यक्षस्थान कॉ. जे. एन. पाटील (अध्यक्ष, मुंबई मंडळ) यांनी भूषविले.
बैठकीस मुंबई मंडळातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपाध्यक्ष कॉ. नारायण सोनावणे, कार्यकारी अध्यक्ष कॉ. अरुण मनोरे, ऑर्गनायझेशन सेक्रेटरी कॉ. वसंत कासार यांसह इतर मान्यवरांनी उपस्थित सेवानिवृत्त कामगारांना विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन केले.
बैठकीत पास सुविधा, दवाखाना सुविधा, आठवे वेतन आयोग (8th Pay Commission) यांसारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी संघटनेने अधिक प्रभावी पावले उचलण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
यावेळी मुंबई मंडळाकडून कल्याण शाखा क्रमांक १ ची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यानुसार –
अध्यक्ष : कॉ. चंद्रकांत रामा
कार्यकारी अध्यक्ष : कॉ. सुनिल कोलेकर
उपाध्यक्ष : कॉ. बी. एन. पावशे
उपाध्यक्ष : कॉ. सुदाम साळुंके
सचिव : कॉ. प्रकाश सोनोने
सहायक सचिव : कॉ. सुरेश राठोड
सहायक सचिव : कॉ. शिवाजी देवकर
खजिनदार : कॉ. आशोक कातकर
ऑर्गनायझेशन सेक्रेटरी : कॉ. सुभाष लोढे
तसेच कसारा शाखेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अध्यक्ष म्हणून कॉ. प्रल्हाद खंदारे, सेक्रेटरी कॉ. दिलीप वेंखडे, ऑर्गनायझेशन सेक्रेटरी कॉ. दिलीप शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली. इगतपुरी शाखेचे सचिव कॉ. अहमद खान हेही बैठकीस उपस्थित होते.
बैठकीच्या शेवटी मुंबई मंडळाचे सचिव कॉ. आनंदा भालेराव यांनी उपस्थित सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले आणि बैठक संपन्न झाल्याची घोषणा केली.
सेवानिवृत्त कामगारांच्या प्रश्नांबाबत संघटना सक्रिय असून येत्या काळातही अशाच प्रकारे सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.


Post a Comment
0 Comments