प्रतिनिधी-मनोहर गायकवाड
परळी तहसील कार्यालयातील तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांना लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) ने सापळा रचून रंगेहात पकडल्याची मोठी कारवाई समोर आली आहे. या घटनेमुळे परळी तालुक्यातील महसूल प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सालंसी प्रमाणपत्र देण्यासाठी तक्रारदाराकडून सुरुवातीला 50 हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती. याबाबत तक्रारदाराने बीड येथील ACB कार्यालयात तक्रार दाखल केली.
तक्रारीनंतर ACB पथकाने पडताळणी करून सापळा रचला.
प्राथमिक माहितीनुसार, मागितलेल्या 50 हजार रुपयांवरून नंतर 20 हजार रुपयांवर तडजोड झाल्याची माहिती समोर आली आहे. ठरलेल्या रकमेची लाच स्वीकारताना तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांना ACB पथकाने रंगेहात पकडले.
या कारवाईनंतर परळी तालुक्यातील महसूल विभागात खळबळ उडाली असून जिल्हाभरात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू असून ACB कडून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई प्रशासनातील भ्रष्टाचाराविरोधात मोठा संदेश देणारी मानली जात आहे.


Post a Comment
0 Comments