Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

🚆 रेल्वे पेंशनर्सच्या आरोग्य समस्यांसाठी पुढाकार.

 


मुंबई | प्रतिनिधी - आनंदा भालेराव 

ऑल इंडिया रेल्वे पेंशनर वेल्फेयर फेडरेशन व एन आर एम यू भायखळा शाखेच्या वतीने आज दि. २४/०२/२०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल गेट येथे रेल्वे कामगार व सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आरोग्यविषयक अडचणी जाणून घेण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात आला.


हा उपक्रम वेणु पी. नायर (महामंत्री, मध्य रेल्वे व कोकण रेल्वे) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी रुग्णांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली.


प्रमुख मागण्या व तक्रारी :

बीपी, शुगर, दमा, किडनी आदी आजारांवरील औषधे नियमानुसार तीन महिन्यांची उपलब्ध करून द्यावीत


जेष्ठ सेवानिवृत्त नागरिकांसाठी वेगळी खिडकी (काउंटर) सुरू करावी


हॉस्पिटलमध्ये उपचार प्रक्रियेत सुलभता व वेग वाढवावा


कार्यक्रमावेळी व्ही. आनंदन (महामंत्री, एन आर एम यू भायखळा) तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. रेल्वे पेंशनर्सच्या अडचणी तातडीने सोडवण्यासाठी संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.


शेवटी उपस्थितांनी

“एन आर एम यू जिंदाबाद”

“ऑल इंडिया रेल्वे पेंशनर वेल्फेयर फेडरेशन जिंदाबाद”

अशा घोषणा देत एकजूट दर्शवली.



Post a Comment

0 Comments