Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

विज्ञान वारी जिल्हास्तरीय परीक्षेत केंद्रीय प्राथमिक शाळा नांदापूरचा घवघवीत विजय.

 प्रतिनिधी -मोहन दिपके 

नांदापूर  – जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा नांदापूर येथील विद्यार्थिनींनी विज्ञान वारी जिल्हास्तरीय परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या नावलौकिकात भर घातली आहे. कुमारी अंजुषा केशव चव्हाण व कुमारी प्रणाली सुनील पतंगे या दोन्ही विद्यार्थिनी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन त्यांची निवड आयुका पुणे येथे झाली आहे. ही बाब शाळेसाठी तसेच संपूर्ण केंद्रासाठी अत्यंत गौरवास्पद मानली जात आहे.


विशेष म्हणजे सलग दुसऱ्या वर्षी केंद्रीय प्राथमिक शाळा नांदापूरच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान वारी परीक्षेत घवघवीत यश मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. या यशाबद्दल केंद्रप्रमुख जे. एम. व्यवहारे सर, मुख्याध्यापक भुरके सर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनायकराव बोरकर, वर्गशिक्षक धुळे सर, गुंजकर सर, विज्ञान शिक्षिका कु. एकोणकर मॅडम, सूर्यवंशी सर, कल्याणकर सर, श्रीमती नाईकवाडे मॅडम तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी दोन्ही विद्यार्थिनींचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


या दोन्ही विद्यार्थिनींना विज्ञान वारी परीक्षेसाठी कु. एकोणकर मॅडम यांनी विशेष मार्गदर्शन केले. त्यांच्या परिश्रमामुळे विद्यार्थिनींना हे यश मिळाले असल्याची भावना शिक्षकवृंदांनी व्यक्त केली.


प्रणाली पतंगे व अंजुषा चव्हाण यांचे पुन्हा एकदा मनःपूर्वक अभिनंदन असून आयुका पुणे येथील पुढील टप्प्यासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत.



Post a Comment

0 Comments