प्रतिनिधी-आनंद भालेराव
मुरबाड तालुक्यातील घाघुर्ली (मु.) येथील रहिवासी, कालकथीत भागोजी हरी खडांगळे (मृत्यू दिनांक २४ जानेवारी २०२६) यांच्या पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम आज दिनांक ०३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता त्यांच्या राहत्या घरी अत्यंत शांत व भावनिक वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने खडांगळे कुटुंबीयांनी एक सामाजिक आणि पर्यावरणपूरक संकल्प केला. दिवंगत भागोजी खडांगळे यांनी कुटुंबासाठी व समाजासाठी केलेल्या कष्टमय, प्रामाणिक आयुष्याच्या आठवणी जतन करण्यासाठी, त्यांच्या जागेत तसेच जवळील शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्याचा संकल्प यावेळी जाहीर करण्यात आला.
यावेळी धार्मिक परंपरेला नवा अर्थ देत, अस्थी नदीत विसर्जित न करता स्वच्छता व पर्यावरण रक्षणाचा संदेश देत झाडांच्या बुडाशी अर्पण करण्यात आल्या. हा उपक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आयु. भरतजी धनगर यांनी भूषविले. धार्मिक विधी व संस्कार आदरणीय बौद्धाचार्य पुंडलिक (बाबा) चंदने, भारतीय बौद्ध महासभा, मुरबाड तालुका यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय शांत वातावरणात पार पाडण्यात आले.
या प्रसंगी राजकीय, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी दिवंगत भागोजी खडांगळे यांच्या जीवनकार्यावर मोलाचे विचार व्यक्त केले. आयु. मधुकरजी थोरात, श्यामजी थोरात, दिलीप धनगर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments