![]() |
| गटनेते डॉ. नीरज वाघमारे यांचा स्वखर्चातून कचराकुंड्या वितरण उपक्रम.. |
प्रतिनिधी-शंकर गायकवाड
यवतमाळ | दि. २२ फेब्रुवारी २०२६
यवतमाळ नगर परिषद प्रभाग क्रमांक १० मध्ये स्वच्छतेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत नगरपालिकेचे गटनेते तथा नगरसेवक डॉ. नीरज वाघमारे यांनी स्वखर्चातून कचराकुंड्यांचे वितरण करून आदर्श उपक्रम राबविला आहे.
ऑइल पेंटच्या टाक्या कापून तयार करण्यात आलेल्या मजबूत व टिकाऊ कचराकुंड्या प्रभागातील विविध ठिकाणी बसविण्यात आल्या. विशेष म्हणजे या कचराकुंड्यांचे लोकार्पण व वितरण स्वच्छता कामगारांच्या हस्ते करण्यात आले. स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्याचा हा अनोखा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचला.
नगरपालिका प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने डॉ. वाघमारे यांनी स्वतः पुढाकार घेत हा उपक्रम हाती घेतला. नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून ओला व सुका कचरा वेगळा टाकण्याचे आवाहन त्यांनी केले.
नेताजी नगर, दारव्हा रोड येथील वंचित बहुजन आघाडीच्या जनसंपर्क कार्यालयावरही स्वच्छता कामगारांच्या हस्ते कचराकुंड्यांचे लोकार्पण करण्यात आले.
“स्वच्छ प्रभाग, सुंदर प्रभाग” या संकल्पनेला बळ देणारा हा उपक्रम नागरिकांकडून कौतुकास पात्र ठरत असून, इतर प्रभागांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.


Post a Comment
0 Comments