वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
प्रतिनिधी-मनोहर गायकवाड
चेरपोली (ता. शहापूर) येथे लवकरच सुरू होणाऱ्या डी-मार्ट सुपर मार्केटमध्ये स्थानिक बेरोजगार तरुणांना रोजगारात प्राधान्य द्यावे, अशी ठाम मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शहापूर तालुक्याच्या वतीने करण्यात आली आहे.
या संदर्भात तालुकाप्रमुख कुलदीप (बाळा) धानके यांनी शहापूरचे कर्तव्यदक्ष तहसीलदार मा. परमेश्वर कासुळे साहेब यांना निवेदन सादर केले. शहापूर तालुक्यातील तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी असून, स्थानिक पातळीवर सुरू होणाऱ्या मोठ्या आस्थापनांतूनच रोजगाराची संधी मिळावी, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी त्यांच्या समवेत विधानसभा संपर्कप्रमुख मिलिंद देशमुख, तालुका विस्तारक गणेश अवसरे, चेरपोलीचे उपसरपंच सुनिल भेरे, राजेश फर्डे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
डी-मार्टसारख्या मोठ्या व्यावसायिक प्रकल्पांमुळे परिसराचा विकास होत असताना, त्याचा थेट लाभ स्थानिक नागरिकांना मिळणे आवश्यक असल्याचे मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
शहापूर तालुक्यातील तहसीलदारांना निवेदन देताना सांगण्यात आले की, आपण प्रशासकीय स्तरावर डी मार्ट च्या व्यवस्थापना सोबत संयुक्त बैठक आयोजित करून स्थानिक बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी आवश्यक चर्चा करावी अशी विनंती केली.


Post a Comment
0 Comments