वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
टिटवाळा – टिटवाळा येथील ओंकारेश्वर चाळ परिसरात महिलांनी एकत्र येत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी केली. संपूर्ण परिसर भगव्या पताकांनी सजवण्यात आला होता. “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व आरती करून करण्यात आली. उपस्थित महिलांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेत शिवरायांच्या पराक्रमाचे स्मरण केले. यावेळी शिवचरित्रावरील भाषणे, पोवाडे तसेच लहान मुलांच्या सांस्कृतिक सादरीकरणांनी कार्यक्रमाला विशेष रंगत आणली.
स्थानिक महिलांच्या पुढाकारातून आयोजित या कार्यक्रमात समाजातील एकोपा आणि संघटित शक्तीचे दर्शन घडले. महिलांनीच नियोजन, सजावट आणि प्रसाद व्यवस्था सांभाळत आदर्श आयोजन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी शिवरायांच्या आदर्शांवर चालण्याचा आणि समाजात एकता, स्वाभिमान व न्यायाची भावना जोपासण्याचा संकल्प केला. ओंकारेश्वर चाळ येथील हा उत्सव परिसरातील नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरला.



Post a Comment
0 Comments