Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

ई-पेमेंटमुळे वीज बिल भरण्यात क्रांती

वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज

कार्यकारी संपादक : रितेश साबळे

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर विभागात वीज ग्राहकांचा डिजिटल पेमेंटकडे कल लक्षणीयरीत्या वाढताना दिसत आहे. महावितरण (MSEDCL) च्या आकडेवारीनुसार, संभाजीनगर व जालना जिल्ह्यातील सुमारे ५ लाखांहून अधिक ग्राहकांनी वीज बिले ई-पेमेंटद्वारे भरण्याचा पर्याय स्वीकारला आहे.


या डिजिटल व्यवहारांमुळे आतापर्यंत १ हजार ३०० कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचे व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहेत. यामध्ये यूपीआय, नेट बँकिंग, डेबिट कार्ड तसेच अधिकृत मोबाईल अ‍ॅप्सच्या माध्यमातून करण्यात आलेल्या पेमेंटचा समावेश आहे.


महावितरणकडून ग्राहकांना डिजिटल पेमेंटसाठी प्रोत्साहन देण्यात येत असून, ई-पेमेंट करणाऱ्या ग्राहकांना ०.२५ टक्के सूट देण्यात येत आहे. विशेष बाब म्हणजे, क्रेडिट कार्ड वगळता इतर कोणत्याही डिजिटल माध्यमावर अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही.


यासोबतच, जे ग्राहक ई-मेलद्वारे वीज बिल स्वीकारतात, त्यांना वार्षिक १२० रुपयांची अतिरिक्त सूट देण्यात येत आहे. यामुळे कागदाचा वापर कमी होऊन पर्यावरण संवर्धनालाही हातभार लागत आहे.


डिजिटल पद्धतीने वीज बिल भरण्यामुळे ग्राहकांचा वेळ वाचत असून, कार्यालयीन रांगा टळत आहेत. तसेच व्यवहार अधिक सुरक्षित आणि पारदर्शक होत असल्याने नागरिकांमध्ये या सुविधेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. आगामी काळात ई-पेमेंट करणाऱ्या ग्राहकांची संख्या आणखी वाढेल, असा विश्वास महावितरण अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.



Post a Comment

0 Comments