Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

‘गांधी, नेहरू का नकोत?’ या विषयावर संजय आवटे यांचे संगमनेर मध्ये परखड भाष्य.

 

सत्यशोधक व्याख्यान मालिकेला उत्स्फूर्त प्रतिसाद.

संगमनेर (तेजस घोसाळे) : सत्यशोधक विचारमंचच्या वतीने व्यापारी असोसिएशन हॉल, संगमनेर येथे रविवारी (दि. २२ फेब्रुवारी) सायं. ५ वाजता ज्येष्ठ पत्रकार तथा दैनिक लोकमत चे संपादक संजय आवटे यांचे “गांधी, नेहरू का नकोत?” या विषयावर व्याख्यान उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडले. सत्यशोधक व्याख्यान मालिकेतील हे दुसरे पुष्प ठरले.


देशातील सध्याच्या गुंतागुंतीच्या सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक परिस्थितीत राष्ट्राला पुन्हा एकदा महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची नितांत गरज असल्याचे आवटे यांनी ठामपणे प्रतिपादन केले. सोशल मीडियावरून या महापुरुषांविषयी पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर संविधानप्रेमी नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले. इतिहासातील अनेक उदाहरणांच्या आधारे त्यांच्या विचारांच्या बळावरच देशातील अंधारमय परिस्थितीवर मात करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजय थोरात होते. व्यासपीठावर पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, सत्यशोधक विचारमंचचे समन्वयक संदीप काकडे यांची उपस्थिती होती. तसेच हिरालाल पगडाल, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या उत्कर्षाताई रुपवते, सीताराम राऊत, सूर्यकांत शिंदे, डॉ. रविंद्र घोसाळे, के. जी. भालेराव, प्रा. विकास जगताप, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या रंजनाताई गवांदे, विठ्ठल शेवाळे, राष्ट्र सेवा दलाचे दत्ता ढगे, अनुराधाताई आहेर, किशोर चव्हाण, संदीप वाकचौरे आदींसह विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. समीर लामखडे यांनी केले, तर प्रास्ताविक छात्रभारतीचे अनिकेत घुले यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली व संदीप काकडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.


संगमनेरात विचारमंथनाची नवी लाट निर्माण करणारे हे व्याख्यान ठरले.



Post a Comment

0 Comments