Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

जालना : घरकुल लाभार्थ्यांचे रखडलेले हप्ते तात्काळ जमा करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा

प्रतिनिधी - शंकर गायकवाड 

जालना : प्रधानमंत्री घरकुल, रमाई घरकुल तसेच इतर विविध घरकुल योजनांतर्गत मंजूर झालेल्या घरकुलांचे हप्ते तांत्रिक कारणांमुळे रखडल्याने लाभार्थी अडचणीत सापडले आहेत. यामुळे वंचित आघाडी आघाडीच्या वतीने जालना पंचायत समितीचे कार्यालयीन अधीक्षक कपे यांची भेट घेऊन प्रलंबित हप्ते तात्काळ लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी करण्यात आली.


सेवली सर्कलसाठी गृहनिर्माण अभियंत्याची तातडीने नेमणूक करावी, जेणेकरून रखडलेले प्रस्ताव मार्गी लागतील, अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली. तसेच जालना तालुक्यातील नेर, मौजपुरी, हिवरा, रोषणगाव, पिरकल्याण, देवमूर्ती, भाटेपुरी, रेवगाव व वाघ्रुळ सर्कलमधील लाभार्थ्यांचे हप्ते प्रलंबित असल्याकडेही सांगण्यात आले.


कार्यालयीन अधीक्षक कपे यांनी संबंधित गृहनिर्माण अभियंत्यांशी संपर्क साधून हप्ते वितरणातील विलंबाबाबत सूचना केल्याची माहिती देण्यात आली. मात्र, तरीही लाभार्थ्यांच्या खात्यात तात्काळ रक्कम जमा न झाल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धरणे व निदर्शने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके यांनी दिला.


यावेळी तालुकाध्यक्ष भानुदास साळवे, ज्ञानेश्वर बोबडे, शत्रूघ्न कोळी, परमेश्वर बेढे, संजय आदमाने, भगवान आदमाने, सतीश सूर्यनारायण, दत्ता आदमाने, कपिल सूर्यनारायण, धनराज गिरी यांच्यासह मोठ्या संख्येने लाभार्थी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments