Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

औंढा नागनाथ येथे उबाठा पक्षाचे ‘भीक मागो आंदोलन’ शेतकऱ्यांच्या अनुदानासाठी अधिकाऱ्यांच्या लाचखोरीविरोधात आक्रमक भूमिका

 


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज 

औंढा नागनाथ (प्रतिनिधी) : मोहन दिपके 

औंढा नागनाथ तालुक्यातील शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचे अनुदान मिळण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडून पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षाच्या वतीने आज अनोख्या पद्धतीने ‘भीक मागो आंदोलन’ करण्यात आले.

सिंचन विहीर, जनावरांचे गोठे यांसह विविध शासकीय योजनांची कामे पूर्ण होऊनही अनुदान मिळत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. याबाबत यापूर्वी संबंधित प्रशासनाला निवेदने देण्यात आली होती, मात्र त्याची कोणतीही दखल न घेतल्याने पक्षाने आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.

आज सकाळी १० ते ११ या वेळेत औंढा नागनाथ बसस्थानक परिसरात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी २५०० रुपये जमा करून ती रक्कम औंढा नागनाथ पंचायत समिती कार्यालयासमोर उधळत प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध केला.

“पैसे घ्या पण अनुदान द्या” अशी ठाम व संतप्त मागणी यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली.

या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने देण्यात आला.

या आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख मा. श्री. संदेशभाऊ देशमुख, तालुका प्रमुख मा. श्री. माऊली झटे यांच्यासह सुनील काळे, अनिल कदम, बबन इघारे, सुदामराव वैद्य, अ‍ॅड. डी. नागरे, रानोजी आव्हाड, विष्णू खटके तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments