टिटवाला | प्रतिनिधी- आनंदा भालेराव
ऑल इंडिया रेल्वे पेंशनर वेल्फेयर फेडरेशन, मुंबई मंडळ यांच्या वतीने ज्येष्ठ रेल्वे सेवानिवृत्त कामगार आयु. बबन साळवे (वय ८२ वर्षे) यांना न्याय मिळवून देण्यात यश आले आहे. आयु. साळवे हे कामगार मुख्य वर्कशॉप मुख्यालय, माटुंगा येथून सेवानिवृत्त झाले असून सध्या विर सावरकर नगर, मांडा, टिटवाला (पश्चिम) येथे वास्तव्यास आहेत.
त्यांचा फॅमिली पास पूर्वी माटुंगा वर्कशॉप मुख्यालय येथे मिळत होता. मात्र, वाढत्या वयामुळे होणाऱ्या अडचणी लक्षात घेता संघटनेने प्रशासनाकडे वारंवार लेखी निवेदने सादर केली. तसेच टिटवाला स्टेशन प्रबंधक यांच्याकडे पाठपुरावा करून अखेर फॅमिली पास राहत्या ठिकाणाजवळील टिटवाला रेल्वे स्थानकावर मिळण्याची व्यवस्था करून देण्यात आली.
याशिवाय आयु. बबन साळवे यांनी ८० वर्षे पूर्ण केल्याने लागू होणाऱ्या अतिरिक्त वाढीव पेन्शन योजनेअंतर्गत मूळ पेन्शनवर २० टक्के वाढ, महागाई भत्त्यासह मिळवून देण्याचे महत्त्वपूर्ण कामही संघटनेच्या वतीने पूर्ण करण्यात आले.
या संपूर्ण प्रक्रियेत मुख्यालयातून काॅ. पी. जे. शिंदे, काॅ. रसिक मलबारी, मुंबई मंडळ मधुबन, काॅ. जे. एन. पाटील (अध्यक्ष, मुंबई मंडळ), काॅ. वसंत कासार (ऑर्गनायझेशन सेक्रेटरी, मुंबई मंडळ) तसेच कसारा शाखेचे काॅ. प्रल्हाद खंदारे (अध्यक्ष), काॅ. दिलीप शिंदे (ऑर्गनायझेशन सेक्रेटरी) व काॅ. अशोक सोनावणे (खजिनदार) यांनी मोलाचे सहकार्य केले.
ज्येष्ठ रेल्वे पेंशनर्सच्या समस्या सोडवण्यासाठी संघटना सातत्याने कार्यरत असून, हा यशस्वी पाठपुरावा अनेक पेंशनर्ससाठी प्रेरणादायी ठरणार आहे.


Post a Comment
0 Comments