Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

फॅमिली पेन्शन प्रकरणात न्याय; चार वर्षांनंतर जगताप कुटुंबाला दिलासा.

 


प्रतिनिधी । आनंद भालेराव .

मुंबई, दि. 25 फेब्रुवारी 2026 — ऑल इंडिया रेल्वे पेंशनर वेल्फेयर फेडरेशन मुंबई मंडळाच्या पुढाकारातून एका फॅमिली पेन्शनधारक कुटुंबाला अखेर योग्य न्याय मिळाला आहे.


स्वर्गीय के. व्ही. जगताप (सेवानिवृत्त शंटिंग मास्टर तथा मुख्य यार्ड प्रबंधक, कल्याण) यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सौ. पुष्पा के. जगताप तसेच अविवाहित मुलगी रागिनी जगताप यांची नावे फॅमिली पेन्शन योजनेत व कुटुंबीय पास/ओळखपत्रावर समाविष्ट करण्यात आले नव्हते. या त्रुटीमुळे मागील चार वर्षांपासून कुटुंबाला विविध अडचणींना सामोरे जावे लागत होते.


यासंदर्भात रागिनी जगताप यांनी प्रशासनाकडे वारंवार लेखी निवेदने सादर केली तसेच संबंधित अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पाठपुरावा केला. तथापि, प्रश्न निकाली निघत नव्हता.


दरम्यान, फेडरेशनचे कसारा शाखेचे अध्यक्ष कॉ. प्रल्हाद खंदारे यांनी या प्रकरणात लक्ष घालत सेवानिवृत्त मुख्य कार्मिक अधिकारी (मुख्यालय) आदरणीय गणेशन साहेब यांची भेट घेतली. सर्व कागदपत्रांची सविस्तर तपासणी करून वरिष्ठ कार्मिक अधिकारी, मुंबई मंडळ यांच्या नावे वैयक्तिक पत्र देण्यात आले व संबंधित अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटण्याचे निर्देश देण्यात आले.


या पाठपुराव्यानंतर कल्याण येथील यार्ड प्रबंधक कार्यालयाने आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करून कुटुंबीयांची नावे फॅमिली पेन्शन योजनेत व पास सुविधेत समाविष्ट केली. परिणामी, चार वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न अखेर निकाली निघाला असून जगताप कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.


या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान मुख्यालय व मंडळातील पदाधिकाऱ्यांचे मोलाचे ' मार्गदर्शन लाभल्याची माहिती फेडरेशनकडून देण्यात आली.



Post a Comment

0 Comments