प्रतिनिधी -आनंदा भालेराव
नेरळ (ता. २५ फेब्रुवारी २०२६) : आदरणीय वेणु पी नायर, महामंत्री, मध्य रेल्वे व कोकण रेल्वे यांच्या मार्गदर्शनाखाली नेरळ शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा आज दि. २५/०२/२०२६ रोजी नेरळ येथे उत्साहात पार पडली.
सभेची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली. यानंतर उपस्थित कामगार बंधू-भगिनींना सचिव अहवालाचे पुस्तक वितरित करण्यात आले. शाखेने वर्षभरात कामगारांसाठी केलेल्या विविध उपक्रमांचा आढावा, तसेच जमा-खर्चाचा तपशील सभेत वाचून दाखविण्यात आला. हा अहवाल सभेमध्ये सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
उपस्थित कामगारांना मार्गदर्शन करण्यासाठी मुख्यालयातून पी जे शिंदे (जोनल सेक्रेटरी, AIRF), रसिक मलबारी (कार्यकारी अध्यक्ष, मुख्यालय), संतोष कुमार (सहायक महामंत्री, मुख्यालय) तसेच सुहास देशमुख (अध्यक्ष, कल्याण मेन शाखा) यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. संघटनेची भूमिका, कामगारांच्या हक्कांसाठीचे प्रयत्न आणि भविष्यातील नियोजन यावर त्यांनी प्रकाश टाकला.
यावेळी मध्य रेल्वे टॅकमन (CRTU) मुंबई मंडळाचे अध्यक्ष आणि त्यांच्या अनेक गॅंगमेन कामगारांनी सर्वधर्मसमभाव जपणाऱ्या एका युनियनमध्ये प्रवेश केला. नव्याने युनियनमध्ये सामील झालेल्या सर्व सदस्यांचे मान्यवरांच्या उपस्थितीत हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
सभा शिस्तबद्ध व उत्साही वातावरणात पार पडली.


Post a Comment
0 Comments