मुंबई | प्रतिनिधी-शंकर गायकवाड
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या ग्राम रोजगार सेवकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आझाद मैदान येथे सुरू असलेल्या धरणे आंदोलनास भेट देत आंदोलनकर्त्यांशी सविस्तर संवाद साधण्यात आला.
यावेळी ग्राम रोजगार सेवकांनी आपल्या समस्या आणि अडचणी मांडल्या. मानधन वाढ, प्रवास भत्ता, सेवेला स्थैर्य तसेच शासन निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी या प्रमुख मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले. त्यांच्या मागण्यांबाबत सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रभावीपणे आवाज उठवून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन देण्यात आले.
तसेच येत्या २६ फेब्रुवारी रोजी विधानसभेत अर्धा तास चर्चा घेण्यात येणार असल्याची माहिती देत ग्राम रोजगार सेवकांना दिलासा देण्यात आला.
राज्याच्या ग्रामीण विकास व्यवस्थेत ग्राम रोजगार सेवक हे महत्त्वपूर्ण घटक असून त्यांच्या न्याय्य मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. या भेटीमुळे आंदोलनकर्त्यांमध्ये सकारात्मक भावना निर्माण झाली असून त्यांच्या प्रश्नांवर लवकर तोडगा निघेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Post a Comment
0 Comments