Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

आर.पी.आय. (सेक्युलर) मध्ये विविध संघटनांचा भव्य पक्षप्रवेश; विदर्भात संघटन बळकटीला वेग.

वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज

प्रतिनिधी- आनंदा भालेराव

नागपूर, दि. ६ फेब्रुवारी २०२६ —आर.पी.आय. (सेक्युलर) नागपूरच्या वतीने आज रवीभवन येथील कॉन्फरन्स हॉलमध्ये भव्य पक्षप्रवेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शिवसेना सहित विविध लहान-मोठ्या सामाजिक व राजकीय संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आर.पी.आय. (सेक्युलर) पक्षात अधिकृत प्रवेश करून पक्षाच्या ध्येयधोरणांवर विश्वास व्यक्त केला.

हा कार्यक्रम नागपूर–विदर्भ विभागाचे अध्यक्ष मा. दिनेश अंडरसहारे यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. यावेळी अभिषेक चहादे, वंदना चोखंड्रे व मंदा गणवीर यांना पक्षश्रेष्ठींच्या हस्ते नियुक्तीपत्रे व पुष्पगुच्छ देऊन पक्षात सामील करून घेण्यात आले. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे नागपूर व विदर्भातील पक्षसंघटना अधिक बळकट होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आल

कार्यक्रमास आर.पी.आय. (सेक्युलर) चे जिल्हाध्यक्ष आयु. दीपक डोंगरे, महिला फ्रंट शहर अध्यक्षा रत्नमाला गणवीर, मुंबई उपाध्यक्ष मनोज गजभिये यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, आर.पी.आय. (सेक्युलर) हा पक्ष संविधानिक मूल्यांवर आधारित असून वंचित, उपेक्षित, शोषित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने संघर्ष करत आहे. आगामी काळात पक्षसंघटना वाढीसाठी गावागावात संपर्क अभियान राबविण्यात येणार असून जनतेच्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देण्यात येईल.


तसेच शिक्षण, रोजगार, सामाजिक न्याय, महिला सक्षमीकरण आणि युवकांचे प्रश्न यावर ठोस भूमिका घेऊन पक्ष कार्यरत राहील, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

अध्यक्ष दिनेश अंडरसहारे यांच्या मार्गदर्शनाने आणि कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने कार्यक्रमाची सांगता झाली.



Post a Comment

0 Comments