Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

*त्यागमूर्ती माता रमाई जयंती महोत्सव सिन्नर येथे नाविन्यपूर्ण उपक्रमांनी उत्साहात साजरा*

 


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज 

(तेजस घोसाळे, संगमनेर प्रतिनिधी)

दि. ७ फेब्रुवारी रोजी संपूर्ण देशभर माता रमाई जयंती साजरी होत असताना नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे उपेक्षित लोकविकास संस्था यांच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांनी साजरा करण्यात आला. सिन्नर येथील शासकीय विश्रामगृह हॉलमध्ये आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आयु. राघू साळवे यांनी भूषविले.


या प्रसंगी संगमनेर येथील आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्त्या शैलाताई भालेराव, संध्याताई खरे, अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील मान्हेरे येथील सुकेशनी कांबळे, सुगाव येथील सुकेशनी पवार यांच्यासह बौद्ध समाजातील सामाजिक, सांस्कृतिक व उद्योजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या २५ हून अधिक महिलांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

तसेच संगमनेर येथील आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व यशस्वी उद्योजक आयु. डॉ. रविंद्र विठ्ठल घोसाळे यांना दि. १८ जानेवारी रोजी हुपरी (जि. कोल्हापूर) येथे प्राप्त झालेल्या राज्यस्तरीय ‘भंते नागरत्न पुरस्काराबद्दल’, तसेच कोरेगाव भीमा अतिक्रमण कृती समितीच्या महाराष्ट्र राज्य संघटकपदी आयु. दादाभाऊ अभंग यांची झालेली नियुक्ती व त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन सिन्नर तालुक्याच्या वतीने ‘राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार’ देऊन नागरी सत्कार करण्यात आला. याचवेळी साबळे जनविकास फाउंडेशन, कोंभाळणे या संस्थेचे अशोकराव साबळे यांनाही सन्मानित करण्यात आले.


कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बौद्धाचार्य बाळासाहेब आव्हाड, कोंभाळणे येथील आंबेडकरी चळवळीतील धडाडीचे कार्यकर्ते बाळासाहेब साबळे, सिन्नर नगरपरिषदेचे आजी-माजी नगरसेवक व नगरसेविका तसेच संस्थेच्या सर्व कार्यकारी मंडळाने विशेष परिश्रम घेतले.

या कार्यक्रमाला केंद्रीय शिक्षिका जयश्रीताई गांगुर्डे, आंबेडकरी साहित्यिक दीपक गायकवाड सर, शशिकला खैरनार, ताराबाई जाधव, नीलिमा जाधव, रंजनाताई आव्हाड, निर्मला आव्हाड, शाहीर सुरेश घोडेराव, रघुनाथ शिंदे, वसंतराव ढाकणे, प्रभाकर उघडे, संदीप घेगडमल, सुषमा सदावर्ते आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्याग, संघर्ष आणि सामाजिक समतेचा आदर्श जपणाऱ्या माता रमाई यांच्या विचारांना उजाळा देणारा हा जयंती महोत्सव उपस्थितांच्या मनात सामाजिक बांधिलकीची नवी प्रेरणा देऊन गेला.



Post a Comment

0 Comments