Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

मुंबई महानगरपालिकेचा शाळकरी विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; इयत्ता १ ते १० च्या विद्यार्थ्यांना BEST बसने मोफत प्रवास

 


प्रतिनिधी - शंकर गायकवाड 

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या २०२६–२७ च्या अर्थसंकल्पात शाळकरी मुलांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे. इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता BEST बससेवेने मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.


या निर्णयानुसार इयत्ता १ ते १० मधील सर्व विद्यार्थ्यांना लाभ मिळणार असून, प्रवास करताना शाळेचा गणवेश परिधान केलेला असणे किंवा शाळेचे अधिकृत ओळखपत्र (आयडी कार्ड) जवळ असणे आवश्यक राहणार आहे. या योजनेचा सर्वाधिक फायदा महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना होणार असल्याचे मानले जात आहे.


ही योजना BMC च्या ‘SAFAL’ शैक्षणिक मोहिमेचा एक भाग आहे. विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती वाढवणे, प्रवासामुळे शिक्षणात अडथळा येऊ न देणे आणि पालकांवरील आर्थिक ताण कमी करणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.


यापूर्वी विद्यार्थ्यांना BESTच्या ‘Chalo Card’च्या माध्यमातून सवलतीच्या दरात किंवा काही प्रकरणांत मोफत प्रवासाची सुविधा दिली जात होती. मात्र ती योजना कार्ड-आधारित सवलत स्वरूपात होती. आता या नव्या निर्णयामुळे मोफत प्रवासाला अधिकृत अर्थसंकल्पीय मान्यता मिळाली आहे.


या योजनेसाठी सुमारे ८ कोटी ७० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच ज्या भागांत नियमित BEST बससेवा उपलब्ध नाही, त्या परिसरात पालिकेतर्फे विशेष बसची सोय करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.


या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार असून, शिक्षणाकडे अधिकाधिक मुलांचा ओढा वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.



Post a Comment

0 Comments