Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

लोकशाही युवा संघटनेची शहापूर तालुका कमिटी जाहीर.

 


शहापूर, दि. १ मार्च २०२६ : भारताचा मार्क्सवादी लेनिनवादी पक्ष (लाल बावटा) यांच्या मार्गदर्शनाखाली लोकशाही युवा संघटनेची शहापूर तालुका कमिटी गठित करण्यात आली. शहापूर येथे पार पडलेल्या बैठकीत पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.


नवीन कमिटीच्या अध्यक्षपदी कॉम. बारीकराव त्रंबक पवार यांची निवड करण्यात आली असून सचिवपदी कॉम. मच्छिंद्र रघुनाथ चव्हाण, सहसचिवपदी कॉम. कमलेश दशरथ कांबळे यांची निवड झाली. उपाध्यक्ष म्हणून कॉम. हेमंत लक्ष्मण वाघ व कॉम. सानिका वसंत वाघ यांची निवड करण्यात आली. खजिनदारपदी कॉम. गोरखनाथ जिपा मुकणे यांची नियुक्ती करण्यात आली.


तसेच सदस्य म्हणून कॉम. विष्णू नारायण म्हसणे, कॉम. काळुराम पांडुरंग पवार, कॉम. भगवान नामदेव मुकणे, कॉम. पांडुरंग दत्तात्रय पडवळ व कॉम. सुभाष घाटाळ यांची निवड करण्यात आली.


या बैठकीस पक्षाचे शहापूर तालुका सचिव कॉम. भगवान म्हसणे, तालुका सहसचिव कॉम. समाधान हीलम तसेच तालुका सदस्य कॉम. भूषण साबळे व कॉम. प्रकाश चवर उपस्थित होते.


नवीन कमिटीमार्फत शेतकरी, कामगार व युवकांचे प्रश्न संघटितपणे मांडण्याचा व विविध सामाजिक विषयांवर काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.



Post a Comment

0 Comments