प्रतिनिधी – आनंद भालेराव
वासिंद शहर : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सेक्युलर) वासिंद शहराच्या वतीने आयु. राहुलजी दिवेकर यांची शहापुर तालुका उपाध्यक्षपदी निवड झाल्याच्या औचित्याने.
दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, वासिंद येथे तळागाळातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. आयु. संदीपजी पाटील (सदस्य, वासिंद ग्रामपंचायत), आयु. तायडे सर व आयु. आहिरे सर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. सूत्रसंचालन आयु. गुरुनाथ गायकवाड (महाराष्ट्र प्रदेश संघटक) यांनी केले.
यावेळी पक्ष समाजहितासाठी कटिबद्ध असून वंचित घटकांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने कार्य करणार असल्याचे आश्वासन देण्यात आले. शिबिरास आयु. प्रवीण केदारे (जिल्हा सहसचिव), आयु. फिरोजभाई शेख (जिल्हा संघटक), ॲड. वंदनाताई भागवत (तालुका महिला सचिव) तसेच इतर पक्षांचे मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी नागरिकांना आरोग्याबाबत मार्गदर्शन केले.
शेवटी जोसफजी डिसोजा (महासचिव, शहापुर तालुका) यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानून शिबिराची सांगता केली.



Post a Comment
0 Comments