Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

जागतिक महिला दिनानिमित्त एनआरएमयू मुख्यालयात विशेष कार्यक्रम संपन्न

 


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज

प्रतिनिधी : आनंद भालेराव

माटुंगा : नॅशनल रेल्वे मजदूर युनियन (एनआरएमयू) मुख्यालय, माटुंगा यांच्या वतीने दिनांक ८ मार्च २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील पार्सल बिल्डिंगच्या चौथ्या मजल्यावर दुपारी १२ वाजता जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम मुख्यालयाच्या अध्यक्षा काॅ. कामाक्षी बगलवाडीकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडला.


कार्यक्रमाच्या प्रारंभी काॅ. वेणु पी. नायर (महामंत्री, मध्य रेल्वे व कोकण रेल्वे), काॅ. मानसी जोशी (कार्यकारी अध्यक्षा), काॅ. स्वाती म्हात्रे, काॅ. हर्षा शेळके आणि काॅ. पिल्ले मॅडम या मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी काॅ. वेणु पी. नायर यांनी उपस्थित सर्व महिलांना तसेच त्यांच्या परिवाराला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यांनी युनियनतर्फे महिलांसाठी करण्यात आलेल्या कामांचा आढावा घेतला. महिला सशक्तीकरण, महिलांवरील अन्याय-अत्याचाराविरोधात आवाज उठवणे, महिला हक्क आणि विविध सामाजिक प्रश्नांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.


या कार्यक्रमाला मुख्यालयातून काॅ. पी. जे. शिंदे (झोनल सचिव), काॅ. विवेक नायर (सहायक महामंत्री), काॅ. संतोष कुमार (सहायक महामंत्री), काॅ. पुष्कर पाटील (अध्यक्ष, मुंबई मंडळ), काॅ. सचिन नायर (सचिव, मुंबई मंडळ) आणि काॅ. बाळा गांगुडे (खजिनदार, मुंबई मंडळ) उपस्थित होते.

रविवारचा दिवस असूनही महिलांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती. संपूर्ण ऑडिटोरियम महिलांनी खचाखच भरले होते. कार्यक्रमाच्या शेवटी “काॅ. वेणु पी. नायर जिंदाबाद”, “जी. के. लाल सलाम”, “एनआरएमयू जिंदाबाद” आणि “महिला दिनाचा विजय असो” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

Post a Comment

0 Comments