Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

महाबोधी महाविहार मुक्तीसाठी टिटवाला येथे देशव्यापी धरणे आंदोलन

 

प्रतिनिधी : आनंद भालेराव

टिटवाला : बौद्ध समाज समन्वय समिती, मांडा–टिटवाला व पंचक्रोशीतील संलग्न परिसराच्या वतीने महाबोधी महाविहार, बोधगया मुक्ती आंदोलनाच्या समर्थनार्थ एक दिवसीय देशव्यापी धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. हे आंदोलन सोमवार, दिनांक 09 मार्च 2026 रोजी टिटवाला पूर्व येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक, बिकानेर समोर दुपारी 11 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत पार पडले.


आंदोलनाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी “महाबोधी महाविहार बोधगया मुक्त करा”, “बी.टी. ॲक्ट रद्द करा”, “महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या” अशा प्रमुख मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी केली.


या आंदोलनात मांडा–टिटवाला विभागातील विविध सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक आणि राजकीय संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये आरपीआय (आठवले), वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा, जिव्हाळा मित्र मंडळ, रविंद्र रेजन्सी ज्येष्ठ नागरिक कट्टा तसेच पंचक्रोशीतील अनेक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले.


या प्रसंगी आयु. विजयजी भोईर, आयु. बंदेशजी जाधव (नगरसेवक, क. डो. म. पा.), आयु. भावेशजी जाधव, आयु. किशोरजी जाधव, आयु. रमेशजी गायकवाड, प्रमोदजी जाधव, सन्नीजी जाधव, आयु. के. एल. उघडे (ज्येष्ठ बौद्धाचार्य), आयु. दिलीप भोईर रमेशजी गायकवाड आदी मान्यवरांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.


आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी कल्याण तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आयु. पंकज गिरी यांनी स्वतः उपस्थित राहून दक्षता घेतली.


कार्यक्रमाच्या शेवटी “जय भीम, जय संविधान” अशा घोषणांनी आंदोलनाची सांगता करण्यात आली.

Post a Comment

0 Comments