Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

शहापूरमध्ये विद्यार्थ्यांची बेकायदेशीर वाहतूक रोखण्याची मागणी; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कडून पोलिसांना निवेदन.

 


प्रतिनिधी -शंकर गायकवाड 

शहापूर : शहापूर शहरात खाजगी वाहनांतून क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक होत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शहापूर शहर शाखेच्या वतीने शहापूर पोलीस स्टेशन येथे मा. पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांना निवेदन देऊन या बेकायदेशीर वाहतुकीवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.


शहरात अनेक ठिकाणी रिक्षा, व्हॅन व इतर खाजगी वाहनांतून क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता असून, संबंधित वाहनचालकांवर कठोर कारवाई करावी तसेच नियमांचे काटेकोर पालन व्हावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.


या वेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहापूर शहर प्रमुख विजय देशमुख, तालुका विस्तारक गणेश आवसरे, डॉ. अजित पोद्दार, जिल्हा सहसचिव, युवा शहर अधिकारी हर्षद राऊत, शहर सचिव बापू भोपतराव व प्रविण ठाकरे उपस्थित होते.


शहरातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने तातडीने योग्य ती पावले उचलावीत, अशी मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केली.

Post a Comment

0 Comments