प्रतिनिधी-शंकर गायकवाड
टाकीपठार : विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून जायंट्स चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने रिकामवाडी शाळा येथे कूपनलिका (बोअरवेल) उभारून शुद्ध पेयजल सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. या उपक्रमामुळे शाळेतील १२६ विद्यार्थ्यांना स्वच्छ व सुरक्षित पाणी मिळणार असून, त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.
या सुविधेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे तसनीम मन मॅडम, नसीम मॅडम तसेच जायंट्स चॅरिटेबल फाउंडेशन भायखळा चे सर्व सन्माननीय सदस्य आणि पालवी फाउंडेशन यांच्या वतीने कविता कुशवाह मॅडम व रूपाली मॅडम यांच्या उपस्थितीत पार पडले.
कार्यक्रमाला केंद्रप्रमुख बी.एम.धनगर सर सरपंच अनंता मोंढूळा, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष लक्ष्मण गावंडा, उपाध्यक्ष रमेश रिकामा तसेच सर्व ग्रामस्थ आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी “स्वच्छ पाणी ही प्रत्येकाची मूलभूत गरज असून विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि शैक्षणिक प्रगतीसाठी अशा सुविधा अत्यावश्यक आहेत,” असे मत व्यक्त केले.
शाळेचे मुख्याध्यापक श्री.मनोज गोंधळी सर यांनी जायंट्स चॅरिटेबल फाउंडेशन,पालवी फाउंडेशन तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानत, या कूपनलिकेमुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाल्याचे सांगितले.
या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्याम घोडविंदे सर ,गुरुनाथ वाघ सर, मनोज डोहळे सर, संतोष चौधरी सर,अशोक चौधरी सर, मीराताई दरोडा मॅडम यांनी मेहनत घेतली.


Post a Comment
0 Comments