Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

बोगस नर्सिंग संस्थेविरोधात शहापूरमध्ये संताप; कारवाईची जोरदार मागणी

 


प्रतिनिधी : आनंद भालेराव

शहापूर (ठाणे) : शहापूर तालुक्यातील शहापूर येथे कार्यरत असलेल्या “कल्पना नर्स अँड पॅरामेडिकल नर्सेस कोर्स” या कथित बोगस संस्थेविरोधात संतापाची लाट उसळली आहे. या संस्थेकडून दलित, आदिवासी आणि ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून जादा फी उकळून फसवणूक केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.


सदर संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे नियमित शिक्षण दिले जात नसल्याची तक्रार समोर आली आहे. परिणामी, या संस्थेतील तब्बल ९९ टक्के विद्यार्थी नापास होत असल्याचेही सांगण्यात येत आहे. तसेच, विद्यार्थ्यांना शासकीय शिष्यवृत्तीपासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.


याशिवाय, संस्थेकडून विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी कर्नाटक, बेंगळुरू तसेच महाराष्ट्राबाहेरील ठिकाणी पाठवले जात असल्याची बाबही उघड झाली आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान होत आहे.

या पार्श्वभूमीवर शहापूर आदिवासी प्रकल्प कार्यालयात जाऊन संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेण्यात आली. या वेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे ज्येष्ठ नेते अण्णासाहेब रोकडे, महाराष्ट्र प्रदेश सचिव बाळकृष्ण गायकवाड (मामा), युवक आघाडी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विनोदजी थोरात (साहेब), तसेच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे माजी नगरसेवक भीमराव डोळस (साहेब) आदी उपस्थित होते.


सदर बोगस संस्थेविरोधात फसवणूक तसेच ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.




Post a Comment

0 Comments