Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

वासिंदमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य आरोग्य शिबिर; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 


प्रतिनिधी : आनंद भालेराव

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सेक्युलर) पक्षाच्या वतीने भारतीय घटनेचे शिल्पकार, विद्याविभूषित परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त वासिंद शहरातील आंबेडकर चौक येथे दिनांक २८ मार्च २०२६ रोजी भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर वासिंद शहर अध्यक्ष नरेंद्र कोचुरे यांच्या नेतृत्वाखाली वासिंद शहर कमिटी व विभाग कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने यशस्वीरीत्या संपन्न झाले.


या आरोग्य शिबिराचे उद्घाटन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सेक्युलर) पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष रवींद्र चंदने यांच्या हस्ते आंबेडकर चौक येथील स्मारकाला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. तसेच महापुरुषांच्या पुतळ्यांचे पूजन करण्यात आले.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास शहापूर तालुका अध्यक्ष अनिल कांबळे यांनी पुष्पहार अर्पण केला, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास शहापूर महिला तालुका अध्यक्ष ॲड. वंदना भागवत यांनी अभिवादन केले. दीपप्रज्वलनाचा मान तालुका उपाध्यक्ष संतोष गायकवाड व दिलीप भोईर यांनी पार पाडला.


कार्यक्रमात बोलताना रवींद्र चंदने यांनी आयोजकांचे कौतुक करत, अशा सामाजिक उपक्रमांमुळे जनतेला मोठा दिलासा मिळत असल्याचे नमूद केले. आरोग्य शिबिराला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या कार्यक्रमाला ठाणे जिल्हा अध्यक्ष रवींद्र चंदने, ठाणे जिल्हा महासचिव ॲड. सुजित जाधव, जिल्हा सहसचिव प्रविण केदारे, शहापूर तालुका अध्यक्ष अनिल कांबळे, तालुका उपाध्यक्ष संतोष गायकवाड, शहापूर शहर अध्यक्ष विशाल बाविस्कर, महिला विभाग तालुका अध्यक्ष ॲड. वंदना भागवत, तालुका उपाध्यक्ष आशा डिसोझा, तालुका सचिव सविता पंडित, उपाध्यक्ष दिलीप भोईर, नवनीत पानपाटील, विभाग सचिव ॲड. विजय लोंढे, तालुका उपाध्यक्ष राहुल दिवेकर तसेच डॉ. शिंदे, जितेंद्र जाधव, राहुल थोरात, विकास निकम, किरण जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.


कार्यक्रमादरम्यान सर्व मान्यवरांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या आरोग्य शिबिराचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.



Post a Comment

0 Comments