Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

रेल्वे कामगारांच्या मुलांसाठी ऐतिहासिक निर्णय : फर्स्ट क्लास स्टुडंट पासला मंजुरी.

 


प्रतिनिधी : आनंद भालेराव

मुंबई : नॅशनल रेल्वे मजदूर युनियन (NRMU) मुख्यालय माटुंगा रेल्वे कामगारांच्या मुलांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. दररोज शाळेत जाताना मुंबई लोकलमध्ये प्रचंड गर्दीत द्वितीय श्रेणी (सेकंड क्लास) प्रवास करावा लागत असल्याने विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.


सध्याच्या नियमांनुसार पालकांच्या पे-लेव्हलनुसार विद्यार्थ्यांना प्रवास पास दिला जात होता. मात्र, या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव निर्माण होत असल्याची बाब समोर आली होती.


या पार्श्वभूमीवर वेनू पी. नायर, महामंत्री (मध्य रेल्वे व कोकण रेल्वे) यांनी मानवी दृष्टिकोन ठेवत हा मुद्दा जीएम पीएनएम (GM PNM) बैठकीत मांडला. “शाळकरी मुलांमध्ये असा भेदभाव का?” असा सवाल उपस्थित करत सर्व रेल्वे कामगारांच्या शाळकरी मुलांना फर्स्ट क्लास स्टुडंट पास देण्याची मागणी त्यांनी केली.


PNM 3/26 NRMU HQ/66/86 दिनांक 06/11/2025 रोजी हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून, यामुळे आता सर्व पात्र विद्यार्थ्यांना फर्स्ट क्लास पास मिळणार आहे. हा निर्णय रेल्वे कामगारांसाठी एक ऐतिहासिक विजय मानला जात आहे.


या निर्णयामुळे रेल्वे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण असून, संघटनेच्या नेतृत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे. “एक खंबीर नेतृत्व” म्हणून वेणू पी. नायर यांचे अभिनंदन केले जात असून, कामगारांनी “लाल सलाम” देत एकजूट व्यक्त केली आहे.



Post a Comment

0 Comments