Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

जेफ्री एपस्टीन फाईलविरोधात वंचित बहुजन आघाडीचे उग्र आंदोलन पंतप्रधान नरेंद्र मोदी, अनिल अंबानी व केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्या फोटोंची केली होळी

 


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज

कार्यकारी संपादक : रितेश साबळे

मुंबई : जेफ्री एपस्टीन फाईलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, उद्योगपती अनिल अंबानी तसेच पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांची नावे आल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. २ मार्च रोजी मुंबई येथे वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली “मुद्रा मोदी से मुजरा मोदी आंदोलन” आयोजित करण्यात आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.


तसेच अकोला जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एपस्टीन फाईलमध्ये नाव आल्याचा निषेध व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी, उद्योगपती अनिल अंबानी आणि केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्या फोटोंची होळी करून निषेध नोंदविण्यात आला.


या आंदोलनावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, जिल्हाध्यक्ष प्रमोद दैंडवे, महिला जिल्हाध्यक्ष आम्रपालीताई खंडारे, युवा जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, विद्वत सभेचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ देवधरीकर, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, महिला जिल्हा महासचिव संगीता अढावू, युवा जिल्हा महासचिव राजकुमार दामोदर, ज्ञानेश्वर सुलताने, प्रभाताई शिरसाट, दामोदर जगताप, गजानन गवई, नगरसेवक पराग गवई, विकास सदांशिव, अकोला तालुकाध्यक्ष किशोर जामणिक, अकोट तालुकाध्यक्ष अशोक दारोकार, बार्शिटाकळी तालुकाध्यक्ष गोरसिंग राठोड, मुर्तिजापूर तालुकाध्यक्ष सरदार तसेच जिल्हा परिषद सदस्य, प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments